प्रतिकुल परीस्थितीमुळे आम्हीच चिमुकल्यांना मदरशात शिक्षणार्थ पाठवले : पालकांनी दिले जवाब
Due to adverse conditions, we sent our children to Madrasahs for education: Answers given by parents
भुसावळ : दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून 29 अल्पवयीन मुलांची रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी तस्करी होत असल्याच्या तक्रारीनंतर बुधवार, 31 मे रोजी सुटका केली. मानवी तस्करी होत असल्याच्या कलमान्वये भुसावळात एकाला तर मनमाडमध्ये चौघांना पकडून भादंवि 370 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बिहारातील पालकांनी आता पोलिसांकडे धाव घेत आम्हीच बालकांना मदरशात शिक्षणासाठी पाठवल्याची कबुली देत लेखी जवाब लिहून दिला आहे. बिहारातील 19 पालकांनी रेल्वेने शुक्रवारी भुसावळ गाठत लोहमार्ग पोलिसांची भेट घेत सविस्तर जवाब लिहून दिले.
पालक म्हणाले, मुलांना शिक्षणासाठी पाठवले
बिहार राज्यातील पूर्णिया भागातील 19 पालक शुक्रवारी शहरात आल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलिसांची भेट घेत आपल्या मुलांना सांगतील मदरसा शिक्षणासाठी पाठवल्याची माहिती दिल्यानंतर प्रत्येक पालकाचा अधिकार्यांनी स्वतंत्र जवाब नोंदवला आहे तर बिहारात गेलेल्या पोलीस निरीक्षक विजय घेर्डे यांच्यासह अधिकार्यांनी अन्य पालकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनीदेखील मुलांना शिक्षणासाठी सांगली येथे मौलानासोबत पाठवल्याची माहिती दिली. भुसावळातील 29 बालके सध्या जळगावातील बालनिरीक्षण गृहात तर मनमाडमध्ये सुटका करण्यात आलेली 30 मुले नाशिकमधील एनजीओच्या माध्यमातून नाशिक येथील बाल निरीक्षणगृहात आहेत.




बिहारातही नोंदवले जवाब
स्थानिक पोलिसांची मदत घेत भुसावळातील निरीक्षक विजय घेर्डे यांच्यासह पोलीस पथकाने अररीया जिल्ह्यातील महाडगाव, शफिपूर, गौरीया, कणखोर, समस्तापूर या गावात जाऊन तेथे राहात असलेल्या मुलांच्या पालकांची भेट घेतली. तेथे पोलिसांनी 10 जणांचे जबाब नोंद केले.
मुलांच्या ताब्याबाबत जिल्हाधिकारी घेणार निर्णय
दरम्यान, मुलांना पालकांकडे ताबा देण्याबाबत जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल आता बालकल्याण समितीला काय निर्णय देतात? याकडे लक्ष लागले आहे. बालकल्याण समितीनेही मुलांशी संवाद साधत भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून कारवाईबाबत माहिती जाणून घेतली होती.