पालकमंत्री स्पष्टच म्हणाले ; नांदी लागल्यास तर पळणेही कठीण होईल
The Guardian Minister clearly said ; Even running will be difficult if nandi is affected पाळधी : काही लोक मला पैशांची मस्ती दाखवत असून तुमच्याकडे नोटा वाटण्याची ताकत असेलतरी आमच्याकडे या नोटा हिसकवण्याची ताकत आहे. मी कुणाचे प्लॉट गडप केले नाहीत वा घराचे पैसे खावून घरात बसलेला नाही. . माझ्या नावाने धरणगावचे भूत बोंबलत आहे. ही जागा शिवसेनेची आहे ना? मग ये तिकीट घे, चारीमुंड्या चित केले नाही तर बघच, असा थेट निर्वाणीचा इशारा पालकमंत्री गुलाबरावांनी येथे दिला. वाढदिवसानिमित्त पाळधी येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, मेहकरचे आमदार संजय रायमुलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सरिता माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, राजेंद्र चव्हाण, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे, कैलाश चौधरी, मुकुंद सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




मी सीजनेबल पुढारी नक्कीच नाही
गुलाबराव म्हणाले की, माझ्या आयुष्यात फार वाईट अनुभव आले. मी जातीचे राजकारण केले नाही. ते जातीचे राजकारण करत आहेत. मी सीजनेबल पुढारी नाही. त्या सीजनेबल पुढार्यांना आता सर्वजण आठवू लागले आहेत. माझ्या नांदी लागू नका, मी माझ्या अवतारात आलो तर तुम्हाला पळणं मुश्कील होईल, असा इशारा पालकमंत्री गुलाबरावांनी विरोधकांचे नाव न घेता दिला. पाळधीने मला ओळख दिली. मी संधीचे सोने केले. पाळधीला गुलाबराव पाटील यांची ओळख दिली. गर्दी पाहून मी 57 वर्षांचा नव्हे 27 वर्षाचा झालो, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.