जात प्रमाणपत्र नसल्याचा फटका : राजुरा येथील सरपंचासह दोन सदस्य अपात्र


No caste certificate hit : Two members including sarpanch from Rajura disqualified मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा येथील ग्रामपंचायत सरपंचासह दोन सदस्य जात प्रमाणपत्राअभावी जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाने खळबळ
2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राजुरा येथील सरपंच पुष्पा अशोक भोलाणकर व सदस्य नर्मदा योगेश कांडेलकर, अशोक शालिग्राम भोलाणकर (सर्व रा.राजुरा) अनुसुचित जमाती (एस.टी.) च्या राखीव जागेवर निवडून आले मात्र जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने त्यांच्या विरोधात संजय संतोष कांडेलकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 16 फेब्रुवारी रोजी अपिल दाखल केले. जिल्हाधिकारी कार्यलयात अर्जदार व सामनेवाले या दोघांना तारखांना बोलावण्यात आल्यानंतर निवडून आल्यानंतर संबंधितानी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने पुष्पा अशोक भोलाणकर, नर्मदा योगेश कांडेलकर, अशोक शालिग्राम भोलाणकर (राजुरा) यांना अपात्र केले आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !