पाच हजारांची लाच भोवली नंदुरबार पंचायत समितीचा लाचखोर विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

पाच हजारांची लाच भोवली : नंदुरबार एसीबीच्या कारवाईने खळबळ


A bribe of five thousand was caught in the net of the corrupt extension officer of Nandurbar Panchayat Samiti in the net of ACB नंदुरबार : विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या नंदुरबार पंचायत समितीतील विस्तार अधिकार्‍याला नंदुरबार एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत. भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे (53) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. सोमवारी दुपारी पंचायत समितीसमोरील चहाच्या टपरीवर हा सापळा यशस्वी करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
रनाळे खुर्द येथील 55 वर्षीय तक्रारदार यांचे रनाळे खुर्द, ता.नंदुरबार शिवारातील शेत आहे. या शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहिर मंजुरीचा प्रस्ताव मंजूर करून विहिरीच्या अनुदानाची रक्कम तक्रारदार यांना मिळवून देण्यासाठी नंदुरबार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे (53) यांनी सोमवार, 12 जून रोजी पाच हजारांची लाच मागितली होती व तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी झाल्यानंतर सोमवार, 19 रोजी सापळा रचण्यात आला. पंचायत समिती कार्यालयाबाहेरील चहाच्या टपरीवर पंचांसमक्ष निकुंभ यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.



यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान महादू वाघ, हवालदार विजय ठाकरे, विलास पाटील, ज्योती पाटील, संदीप नावाडेकर, देवराम गावीत, मनोज अहिरे, अमोल मराठे, जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !