दर्शना पवार हत्याकांडाचा अखेर उलगडा : पोलिसांच्या तपासात आरोपीने सांगितले हे कारण
Darshana Pawar murder case finally solved: The reason given by the accused in the police investigation पुणे : दर्शना दत्तू पवार या एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तरुणीच्या हत्येचा पर्दाफाश झाला आहे. संशयित राहुल हंडोरेला यंत्रणेने अंधेरी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे. दर्शना या तरुणीची वनपरीक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवड झाल्यानंतर पुण्याच्या संस्थेकडून तिचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आल्याने ती 9 जून रोजी पुण्यात आली व मैत्रीणीकडे थांबल्यानंतर सोमवार, 12 जून रोजी राजगड किल्ल्यावर गेली मात्र दर्शनाची लग्नाची इच्छा व्यक्त करणार्या तरुणाला नकार मिळाल्यानंतर त्याने तरुणीची हत्या केली.
गुन्हा घडताच संशयित पसार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे (वय 28 वर्षे, रा. हिंगणे होम कॉलनी, दत्तमंदीराजवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. मु.पो.शहा, ता. सिन्नर, जि. नाशिक) हा गुन्हयातील मुख्य संशयित असल्याचे व तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरून तपास पथकांनी संशयित राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. राहुलने गुन्हा केल्याचे कबुल केला आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ते गडाकडे निघाले होते. माघारी येताना (पावने अकरा) राहूल एकटाच आला होता. खून केल्यानंतर तो बंगालसह महाराष्ट्ररत विविध ठिकाणी रेल्वेने फिरत होता. दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक नव्हते पण त्यांची ओळख लहापणापासून होती. दर्शनाच्या मामाचे घर आणि आरोपीचे घर समोरासमोर होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.




मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर अटक
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दर्शनाची हत्या लग्नाला नकार दिल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले – आरोपीचे नाव समजल्यानंतर त्याला बुधवारी रात्री उशिरा मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याला लवकरच न्यायालयापुढे हजर केले जाईल. त्यानंतर या गुन्ह्याचा पुढील तपास स्पष्ट होईल.