बलात्काराच्या गुन्ह्याने व्यथित झालेल्या अर्जुन उद्योग समूहाच्या उद्योजकाची कुटूंबासह आत्महत्या


An Arjun Udyog Group businessman who was distressed by the alleged rape committed suicide along with his family कोल्हापूर : बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यथित झालेल्या गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख उद्योजक संतोष वसंत शिंदे (46, गांधीनगर) यांनी पत्नी तेजस्विनी (36) व गुलगा अर्जुन (14) याला विष पाजून त्यांची हत्या केली व नंतर विष पिऊन चाकूने त्यांचा व आपला गळा चिरून घेत बेडरूममध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली.

मानसिक स्वास्थ बिघडल्याने टोकाचे पाऊल
गडहिंग्लजमधीलच माजी नगरसेविकेने शिंदे यांच्याविरुद्ध एप्रिलमध्ये बेळगाव पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. जामिनावर सुटका होताच त्यांनी व्यवसायाकडे लक्ष दिले मात्र स्वास्थ्य बिघडल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी होती.





आत्महत्येपूर्वी डायरीत केला उल्लेख
घटनास्थळी पोलिसांना डायरी सापडली आहे. त्यात लिहिलेल्या ‘सुसाइड नोटमध्ये ’त्या’ माजी नगरसेविकेसह चौघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याची चर्चा आहे त्यामुळे जमलेल्या लोकानी ‘त्या’ चौघांच्या अटकेच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !