Woman molested in Jamner taluka ; Suspect arrested जामनेर तालुक्यातील महिलेचा विनयभंग ; संशयिताला अटक


Woman molested in Jamner taluka ; Suspect arrested जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 31 वर्षीय महिलेचा मध्यरात्री झोपलेली असतांना एकाने अश्लिल कृत्य करत विनयभंग केला. संशयिताला पोलिसांनी अटक केली. जामनेर पोलिसात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री केला विनयभंग
जामनेर तालुक्यातील एका गावात 31 वर्षीय महिला ही आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. शनिवार, 24 जून रोजी मध्यरात्री महिला ही कुटुंबियांसह गच्चीवर झोपलेली असतांना गावातील विजय समाधान धुरकर याने महिलेजवळ येवून तिच्याशी अंगलट केली तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी विजय समाधान धुरकर यांच्या विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !