Terrible accident on Samriddhi highway ; 26 people died as a private passenger bus caught fire महाराष्ट्र हादरला ; भरधाव खाजगी लक्झरी खांबाला धडकून उलटली : 26 प्रवाशांचा होरपळून ठार


Accident : Terrible accident on Samriddhi highway ; 26 people died as a private passenger bus caught fire बुलढाणा : राज्यात अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. बुलढाण्यानजीकच्या सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावानजीक भरधाव लक्झरी बस खांबावर धडकल्यानंतर उलटली व बसने पेट घेतल्याने बसमधील 26 प्रवासी होरपळून ठार झाले. हा अपघात आज पहाटे दिड वाजेच्या सुमारास घडला. दरम्यान, अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.





होरपळून प्रवाशांचा मृत्यू
विदर्भ ट्रॅव्हल्सची बस (एम.एच.29 बी.ई.1819) ही नागपूरवरुन पुण्याकडे जात असताना शुक्रवार, 30 जून रोजी नागपुरवरून सायंकाळी पाच वाजता पुण्यासाठी निघाल्यानंतर शनिवार, 1 जुलै च्या रात्री 1.22 मिनिटाने धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली व रस्त्यावर डिझेल सांडले गेल्यानंतर काही मिनिटामध्ये पेट घेतल्यानंतर गाडीचा स्फोट होवून आग लागली व त्यात बाहेर पडता न आल्याने 25 प्रवासी होरपळून ठार झाले.

मृतदेह ओळखणे कठीण
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते औरंगाबाद या मार्गावर बस प्रथम उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी खांबाला धडकली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या मधोमध असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकल्याने बस पलटी झाली. बस डावीकडे वळली, त्यामुळे बसचा दरवाजा खाली आला. अशा परिस्थितीत लोकांना बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. अपघातानंतर बसमधील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरले. डिझेल सांडल्यामुळे बसला आग लागली. पोलिसांनी बसमधून 26 मृतदेह बाहेर काढले आहेत. गंभीर भाजल्याने मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. ही बस वातानुकुलीत असल्याने अपघातानंतर बसचा दरवाजा लॉक झाला होता. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

पोलीस अधीक्षकांची धाव
जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने हेही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या घटनास्थळावर पाच ते सहा रुग्णवाहिका, सिंदखेड राजा, किनगाव राजासह लगतच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी पोहोचलेले आहेत. बसमधील प्रवाशांचा जळून कोळसा झाल्याने मृतकांची एाळख पटवणे अवघड काम झाले आहेत. यासंदर्भात डीएनए टेस्टच्या दृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सकांशी चर्चा झाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !