पंतप्रधानांच्या नेतृत्वात नऊ वर्षात शाश्वत व सर्वसमावेशक विकास

पत्रकार परीषदेत आमदार संजय सावकारे : योजनांचा मांडला आढावा


Sustainable and inclusive development in nine years under the leadership of the Prime Minister भुसावळ : देशाच्या पंतप्रधानपदी पंतप्रधान मोदी यांची वर्णी लागल्याने त्यांनी गेल्या नऊ वर्षांत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास केला आहे. देशाची प्रगती पथावर घौडदोड असून देश संरक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. देशभरात रस्त्यांचे जाळे विणले गेले असून रस्ते, पाणी व आरोग्य आदी मूलभूत सुविधा शेवटच्या घटकांपर्यंत पुरवण्यावर केंद्रासह राज्य शासनाचा भर राहिला असल्याची माहिती भुसावळ भाजपाचे आमदार संजय सावकारे यांनी येथे आयोजित पत्रकार परीषदेत दिली. सुरभी नगरातील संपर्क कार्यालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता आयोजित पत्रकार परीषदेत आमदारांनी मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राबवण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली तसेच माध्यमांकडून अपेक्षाही जाणून घेतल्या.

रेल्वे स्थानकांचा विकास
आमदार सावकारे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार देशात समता निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक धोरण आणि कृतीत ‘भारत प्रथम’ राहिला आहे त्यामुळे देश बाह्य आणि अंतर्गत पातळीवर एका मजबूत हातात सुरक्षित आहे शिवाय मोदींमुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानही वाढला असल्याचे ते म्हणाले. 70 वर्षात काँग्रेसने जितका विकास केला नाही तितका विकास मोदीजींच्या काळात झाला असून देशभरातील रेल्वे स्थानकांनी आता कात टाकली असून 140 कोटी जनतेला सुविधा देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत.





कोविड लसीमुळे देशाचा सर्वदूर गौरव
आर्थिक व्यवस्थापन, उपेक्षित समाजाचे सक्षमीकरण, संस्कृतीचे संवर्धन, आव्हानात्मक उद्दिष्टे आणि निर्धारित मुदतीपूर्वी ते साध्य करणे हेच पंतप्रधान मोदी यांची मोठी उपलब्धी आहे. आपल्या देशाने कोविड-19 काळात केलेल्या कार्याचे संपूर्ण जगाने कौतुक केले आहे. जगभरात कोविडमुळे मृत्यूचे तांडव सुरू असताना देशात विकसीत झालेल्या लसीमुळे देशाचा नावलौकीक वाढवला शिवाय कोविडवर मात करण्यासाठी विक्रमी वेळेत संपूर्ण पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्यात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने यश मिळवल्याचे आमदार सावकारे यावेळी म्हणाले. गेल्या नऊ वर्षात बहुतांश क्षेत्रात देशाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वोच्च निर्यात नोंदवली गेली आहे. देशात डिजिटल क्रांती होत असून देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यासाठी ग्रामीण भागात विद्युतीकरण आणि प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

बँकांसह शासकीय कार्यालयातील दलाल हटवावेत
शहरातील माध्यम प्रतिनिधींनी शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये वाढलेला एजंटांचा सुळसुळाट थांबवण्यासह शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये दलालांमार्फत मुद्रा लोण मिळत असल्याची व सर्वसामान्यांना लोणसाठी फिरवाफिरव केली जात असल्याची तक्रार केली व या प्रकारावर लोकप्रतिनिधी म्हणून अकुंश लावण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली शिवाय स्थानिक स्तरावरील रस्त्यांसह पाणी व अतिक्रमणाचा प्रश्न निकाली निघण्याची मागणी आमदारांकडे केली. माध्यम प्रतिनिधींसाठी घरकुल, पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली शिवाय आधार व पॅनकार्डची सक्ती थांबवून दंडात्मक रक्कम कमी करण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. समस्यांबाबत योग्य तो पाठपुरावा करून समस्या सोडवण्याचे आश्वासन आमदारांनी यावेळी दिले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
प्रसंगी आमदार संजय सावकारेंसह सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, उद्योजक मनोज बियाणी, स्वीय सहाय्यक प्रवीण जवरे आदींची उपस्थिती होती.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !