Five lakhs to the heirs of the victims of the Buldhana accident : Inspection by the Chief Minister and Deputy Chief Minister  बस अपघातात 26 प्रवाशांचा मृत्यू  : अपघाताची होणार चौकशी : मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत : मुख्यमंत्र्यांकडून पाहणी


Five lakhs to the heirs of the victims of the Buldhana accident: Inspection by the Chief Minister and Deputy Chief Minister बुलढाणा : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे दिड वाजेच्या सुमारास घडली होती. अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व दौरे रद्द करीत अपघातस्थळी भेट देत पाहणी केली. मृतांच्या वारसांना पाच लाखांची मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करीत जखमींचा खर्च राज्य शासन करणार असल्याची घोषणा केली तसेच अपघाताच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले.

खाजगी बसेसच्या वेगावर हवे नियंत्रण
अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी खासगी बसच्या वेगावरील कायदेशीर नियंत्रणाचा मुद्दा उपस्थित केला आहे.





मुख्यमंत्र्यांकडून अपघातस्थळाची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपघातस्थळी भेट देत पाहणी केली. बसमधील बाहेर आलेल्या लोकांनी रस्त्यावरील ट्रकचालकांकडे मदत मागितली मात्र अंधाराची वेळ असल्याने अपेक्षित मदत मिळाली नाही अशी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आली. अपघाताचे प्रकरण सरकारने गांभीर्यानं घेतलं असून अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. सध्या जखमींच्या उपचारावर अधिक लक्ष द्यावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. जखमी पूर्ण बरे होईपर्यंत राज्य सरकार त्यांची काळजी घेईल. त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च केला जाईल. तर, शासनाची जबाबदारी म्हणून मृताच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत केली जाईल. अपघात का झाला? त्यामागे काय कारणे होती? अपघात कसे रोखता येईल? याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !