भाग गए रणछोड़ सभी ; देख अभी तक खड़ा हूँ मैं ; शरद पवारांचा पावसात भिजलेला फोटो तुफान व्हायरल


Bhag Gaye Ranchod all ; Dekh Abhi Tak Khadda Hoon Main ; Sharad Pawar’s rain-soaked photo went viral नाशिक : अजित पवारांच्या बंडानंतर डॅमेज कंट्रोलसाठी वयाच्या 82 व्या वर्षातही शरद पवार ताकदीने उभे राहिले असून त्यांनी शनिवारपासून उत्तर महाराष्ट्रात झंझावाती दौर्‍याला जोरदार सुरूवात केली असून निष्ठावाांकडून त्यांचे उत्फूर्त स्वागत केले जात आहे. अशातच शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजल्यानंतर त्याबाबतचा फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केल्याने तो तुफान व्हायरल झाला आहे. राज्यात आता वातावरण बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
शनिवारी मुसळधार पावसात मुंबईहून नाशिककडे निघालेल्या शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केलं. यावेळी ठिकठिकाणी शरद पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी डिजिटल बॅनर लावूनही त्यांचे स्वागत करीत आगामी काळात शरद पवार यांच्या पाठीशी ठाम असल्याचे दाखवून दिले आहे.





रण मे अटल खडा हूँ मैं
पावसाचे दिवस असतानाही दौर्‍यावर निघालेल्या शरद पवार यांचा पावसात भिजलेला एक फोटो सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. तसेच ‘भाग गए रणछोड सभी, देख अभी खडा हूँ मै, ना थका हूँ, ना हारा हूँ, रण मे अटल खडा हूँ मै, या काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. सगळे पळपुटे पळून गेले तरी, मी अजूनही उभा आहे. मी ना थकलोय, ना हरलोय, रणामध्ये अटलपणे उभा आहे, असा त्याचा उर्थ होतो. या माध्यमातून शरद पवार यांचा लढाऊ बाणा दर्शवण्यात आला आहे.

ना टायर्ड ना रीटायर्ड
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही शरद पवार यांनी निवृत्तीचं वय झाले नसल्याचे सांगून मी वयाच्या 82 व्या वर्षीही काम करू शकतो. मी अजून म्हातारा झालेलो नाही. मी ना टायर्ड झालोय, ना रीटायर्ड झालोय, अशा शब्दात निवृत्तीचा सल्ला देणार्‍या अजित पवार यांना टोलाही लगावला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !