Successful launch of Chandrayaan-3 चांद्रयान- 3 चे यशस्वी प्रक्षेपण


Successful launch of Chandrayaan-3 श्रीहरीकोटा : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता बाहुबली रॉकेट एलव्हीएम-3 रॉकेटद्वारे भारताने चांद्रयान-3 मिशन लाँच केले. इस्रोचे अध्यक्ष एस.सोमनाथ इतर शास्त्रज्ञांसह मिशन कंट्रोल रूममध्ये यावेळी उपस्थित होते. चांद्रयान-3 अंतराळयानामध्ये तीन लँडर/रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्यूल आहेत. सुमारे 40 दिवसांनंतर म्हणजेच 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरतील.

माती व धूळीचा होणार यशस्वी अभ्यास
हे दोघेही 14 दिवस चंद्रावर प्रयोग करतील, तर प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणार्‍या रेडिएशनचा अभ्यास करेल. मिशनच्या माध्यमातून इस्रो चंद्राचा पृष्ठभाग किती सिस्मिक आहे हे शोधून काढेल, माती आणि धूळ यांचा अभ्यास केला जाईल.





देशवासीयांनी दिल्या शुभेच्छा
चंद्रयान-3च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-3 (एलव्हीएम-3) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावर सज्ज झाले. शुक्रवारी दुपारी 2.35 वाजता चंद्रयान 3 ने अवकाशात यशस्वी झेप घेतल्यानंतर देशभरात जल्लोष करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौर्‍यावर असलेतरी त्यांनी ट्विट करुन भारताच्या या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल, असेही मोदींनी म्हटले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !