प्रा.डॉ.सुनील नेवे अर्जेंटिनातील आंतरराष्ट्रीय परीषदेत सहभागी होण्यासाठी रवाना
भुसावळ : सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुनील नेवे हे नुकतेच अर्जेंटिना या देशाची राजधानी ब्युनोस एअर येथे आंतरराष्ट्रीय पॉलिटिकल सायन्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या 27 व्या वर्ल्ड काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परीषदेमध्ये सहभागी होण्यासाठी भुसावळ येथून रवाना झालेले आहेत. 15 ते 19 जुलै 2023 दरम्यान युनिव्हर्सिटी ऑफ कॅटोलिका अर्जेंटिना येथे होणार्या या आंतरराष्ट्रीय परीषदेमध्ये प्रा.डॉ.सुनील नेवे हे रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा भारताच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक पैलूंवर झालेल्या परिणामांचा अभ्यास या विषयावर शोधनिबंध सादर करतील.
सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सेक्रेटरी नितीन चौधरी, अमोल हरीभाऊ जावळे, दिलीप हरी चौधरी, हेमलता इंगळे, मोहन चौधरी, नारायण बापू चौधरी, नितीन लहू चौधरी, लीलाधर अप्पा चौधरी, किशोर महाजन, गणेश नेहेते, अरुण चौधरी, भास्कर पिंपळे, मधुकर परतणे, इच्छाराम चौधरी तसेच सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे, उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, प्रा.जतीन मेढे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.



