खिर्डीसह परीसरातील ग्रामस्थ ‘आय फ्लू’ने बेजार

25 टक्के ग्रामस्थ बाधीत : सरकारीसह खाजगी दवाखाने गर्दीने फुल्ल


Villagers in Khirdi and surrounding areas are sick with ‘eye flu’ खिर्डी : रावेर तालुक्यातील खिर्डीसह परीसरात तापाच्या साथीसह आय फ्लू (डोळ्यांची साथ) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सुमारे 25 टक्क्यांवरून अधिक ग्रामस्थांना झालेल्या साथीमुळे दिवसागणिक या भागात रुग्णसंख्या वाढतच आहे. सर्दीसह डोकेदुखी व तापाच्या साथीसह डोळ्यांच्या आजार जडलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. व्हायरल फिव्हर, टायफाईड, हिवताप तसेच डोळे येणे या आरोग्याच्या समस्या वाढलेल्या दिसत आहेत. तसेच खिर्डीसह परीसरात दररोज रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने खाजगी दवाखान्यांसह सरकारी दवाखाने रुग्णांच्या गर्दीने फुल्ल झाले आहेत.

इफेक्शन होण्याचे प्रमाण वाढले
खिर्डी परीसरातील लहान चिमुकले व आबालवृद्धांना या रोगांनी ग्रासल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यामुळे डोळ्यात बॅक्टेरियल इन्फेक्शनचे प्रकार वाढल्याने लोकसंख्येच्या 20 ते 25 टक्के लोकांना डोळ्यांच्या आजाराची लागण झाली आहे. डोळे लाल होणे, चिकट होणे व डोळ्यात खुपत राहणे हे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब या आजारामुळे ग्रस्त झाल्याची माहिती आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डोळ्यात बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.



काळजी घेण्याचे यंत्रणेचे आवाहन
एखाद्या घरात कुणालाही डोळ्यांचा आजार झाल्यास त्या व्यक्तीने गॉगल किंवा चष्मा वापरावा यासोबत स्वतःला तातडीने विलगीकरण करून घ्यावे, कोणाशीही संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. बाधीत व्यक्तीचे कापड, टॉवेल रुमाल किंवा कोणतीही वस्तू काही दिवसांसाठी वापरू नये. गावात ज्याचे डोळे आले आहेत, त्यांना डोळ्यातून पाणी येणे, डोळे सुजणे, डोळे चिकट होणे, डोळ्यात चिचल्यासारखे वाटणे, सर्दी- ताप येणे यासह विविध लक्षणे आहेत. अशा प्रकारचा कोणताही त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

संसर्गजन्य साथ : विलगीकरण करावे
खिर्डी परीसरात डोळ्यांच्या आजाराची साथ सुरू आहे. पावसाळ्यातील बॅक्टेरियल आणि इन्फेक्शनमुळे डोळे लाल होणे व डोळ्यांचा त्रास होत असल्याने यापासून सुरक्षित राहण्यासाठी कुणालाही डोळ्यांचा त्रास असल्यास त्या व्यक्तीने स्वतःला विलगीकरण करून घ्यावे, जेणेकरून कुटुंबातील इतरांना डोळ्यांचा त्रास होणार नाही. ही साथ संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी, असे डॉ.सुनील कोल्हे म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !