Vijay Choudhary अपर पोलीस अधीक्षक व स्टार कुस्तीपटू विजय चौधरींचा कॅनडातही वाजला डंका
चाळीसगाव तालुक्याचा वाढवला गौरव ः वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक
Additional Superintendent of Police and Star Wrestler Vijay Choudhary has also been criticized in Canada पुणे : चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी व पुणे एसीबीचे अपर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी कॅनडा येथील वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवत देशाचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या यशानंतर चाळीसगाव तालुक्यात आनंदोत्सव साजरा होत आहे. कॅनडामधील विणीपेग येथे वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स ही जागतिक स्तरावरील पोलिस दलाची स्पर्धा सुरू असून पोलीस दलासाठी ते ऑलिंपिक मानले जाते. विजय चौधरी यांचा उपांत्य फेरीत गतविजेत्या जेसी साहोटाशी यांचा सामना होता. अटीतटीच्या लढतीत चौधरी यांनी साहोताचा 11-08 अशा मात केली. अंतिम सामन्यात विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर 10 गुणांची आघाडी घेत 11-01 असा एकतर्फी विजय मिळवत भारताला 125 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवून दिले.
चाळीसगाव तालुक्याचा गौरव
जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे. चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते.




भरीव कामगिरी केल्याचा आनंद
आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद असल्याचे विजय चौधरी यांनी सांगितले. “मी हा विजय भारतातील प्रत्येक पोलीस अधिकार्याला व अंमलदारांना समर्पित करतो. जो देशाला प्रथम स्थान देऊन समाजाची 24 तास सेवा करत असतो. हे सुवर्णपदक मी संपूर्ण भारतीय पोलीस दलाला समर्पित करतो.”