जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये आरपीएफ कर्मचार्याच्या गोळीबारात चौघे ठार
Four killed in firing by RPF personnel in Jaipur-Mumbai passenger मुंबई : गुजरातहून मुंबईकडे येत असलेल्या जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेल्या वादांतर आरपीएफच्या एका कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात आरपीएफच्या एएसआयसह चौघांचा मृत्यू झाला. गोळीबाराची ही घटना वापी ते बोरीवलीमीरा रोड स्थानकादरम्यान घडली. मीरा रोड बोरिवली दरम्यान जीआरपी मुंबईच्या जवानांनी या कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.
वादानंतर चालवल्या गोळ्या
जयपूर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक 12956) कोच क्रमांक बी.5 मध्ये ही घटना घडली. ही घटना आज पहाटे 5.23 वाजता घडली. आरपीएफ जवान आणि एएसआय दोघेही ट्रेनमध्ये प्रवास करत होते. दरम्यान, कॉन्स्टेबल चेतनने एएसआयवर अचानक गोळीबार केल्याने प्रवासी प्रवाशांमध्ये गोंधळ पसरला. सोमवार, 31 जुलै 2023 रोजी सकाळी 5.23 वाजता ट्रेन क्रमांक 12956 जयपूर एस बी- 5 मध्ये गोळीबार झाली. एस्कॉर्ट ड्युटीमध्ये सीटी चेतनने एस्कॉर्ट इनचार्ज एएसआय टिका राम यांच्यावर गोळीबार केला. आरोपी आरपीएफ जवान मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. कॉन्स्टेबल चेतन कुमार चौधरी याने त्याच्या एस्कॉर्ट ड्युटी इनचार्ज एएसआय टिका राम मीना यांना चालत्या ट्रेनमध्ये गोळ्या घातल्या. आपल्या सिनियरला गोळ्या घालल्यानंतर तो दुसर्या बोगीत गेला आणि तीन प्रवाशांना गोळ्या घातल्या.




आरोपीला अटक
आरोपीने मीरा रोड आणि दहिसर दरम्यान ट्रेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यत घेऊन त्याचे शस्त्रही जप्त केले. बोरिवली रेल्वे स्थानकावरील रेल्वेतून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे, आरोपी आरपीएफ जवान शस्त्रासह सध्या मीरा रोड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आहे.