महापुरुषांबद्दल गरळ ओकणार्‍या मनोहर भिडे यांना अटक करा : आमदार जितेंद्र आव्हाड


Manohar Bhide is an anti-social pest : MLA Jitendra Awad ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनोहर भिडे यांना अटक करण्याची मागणी केली असून बुधवारपर्यंत भिडे यांना अटक न केल्यास सभागृह चालू न देण्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परीषदेत दिला. मनोहर भिडे हे महापुरुष, समाजसुधारकांच्या बाबतीत गरळ ओकत असून ज्यांचे विचार ंसबंध जगाने स्वीकारले. त्या महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान त्यांनी केल्याने समाजघातक किड्याला वेळीच ठेचा, अशी मागणी त्यांनी केली.

पत्रकार परीषदेत शेलक्या शब्दात टिका
आव्हाड यांनी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन भिडे याच्या विरोधात रितसर लेखी तक्रार दाखल केली. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, युवाध्यक्ष विक्रम खामकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी मनोहर उर्फ संभाजी भिडे याचा बुरखा फाडला.





ती भाषा संस्कृती नाही
डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मनोहर भिडे हे परवा महात्मा गांधी यांच्याबद्दल आणि काल महामानव महात्मा फुले यांच्याबद्दल गलिच्छ शब्दात टीपणी केली. ते ज्या भाषेत बोलले ती भाषा या देशाची संस्कृती नाही. दरवेळेस मुस्लीमांबद्दल बोलून त्यांना निष्कारण ओढून द्वेष निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असतो. यापूर्वी ते पंडीत नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दलही बोलले होते, असेही आव्हाड म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !