‘समृद्धी’ महामार्ग जीवावर : पुलाचा गर्डर कोसळून 17 मजूर ठार
‘Smruddhi’ highway on life : 16 laborers killed as bridge girder collapses
ठाणे : समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू असताना गर्डर लॉन्चिंग मशीन कोसळल्याने 17 मजूर ठार झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ही घटना शहापूरजवळ सरलांबे येथे घडली. महामार्गावर रात्री बांधकाम सुरू असताना गर्डर मशीन 100 फूट उंचीवरून पडले. वृत्तानुसार, शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत 17 मृतदेह आणण्यात आले आहेत.
माजी मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे सुरू झाले आहेत. सध्या नागपूर ते इगतपुरी असा समृद्धी महामार्ग सुरू आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा 100 किलोमीटरचा टप्पा आहे.




समृद्धी महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणारा हा 701 किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग आहे. जो नागपूर, वाशिम, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद, अमरावती, जालना, नाशिक आणि ठाणे या 10 जिल्ह्यांतून जातो.
समृद्धी महामार्गाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी आणि नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते.
त्यानंतर या प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गाव असा एकूण 600 किमीचा रस्ता खुला करण्यात आला आहे.