Nitin Desai Suicide सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या : टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी व्हाईस क्लीप रेकार्ड


Renowned art director Nitin Desai’s suicide: Vice clip records before taking the extreme step मुंबई : कर्जत स्थित एनडी स्टुडिओत सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली. सुसाईड करण्यापूर्वी देसाई यांनी काही व्हॉइस क्लीप रेकॉर्ड केल्याची माहिती असून त्यात चार उद्योगपतींची नावे असल्याचा दावा केला जात आहे.

नितीन देसाई यांनी मंगळवारी रात्री दिल्लीहून मुंबईला आले. त्यानंतर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ते कर्जतच्या एनडी स्टुडिओत पोहोचले. तिथे त्यांनी आपल्या मॅनेजरला बोलावले. तुला उद्या सकाळी मी व्हॉईस रेकॉर्डर देतो, असे ते त्यांना म्हणाले. त्यांच्या सूचनेनुसार मॅनेजरने बुधवारी रेकॉर्डर घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सकाळी मेगाहॉलजवळ त्यांचा मृतदेह गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळला. त्यावेळी हा व्हॉइस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच पडला होता. पोलिसांनी तो जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.





एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या व्हॉइस नोट्समध्ये 4 व्यावसायिकांची नावे आहेत. त्यांनी आपल्याला कसे छळले, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, याचा उल्लेख आहे त्यामुळे आता हे चारही व्यावसायिक चौकशीच्या फेर्‍यात अडकण्याची भीती आहे. देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळी न्यायवैद्यक पथकासह श्वान पथकालाही पाचारण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येमुळे अवघी सिनेसृष्टी हादरली आहे. देसाईंनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हा प्रश्न त्यांच्या मित्रांसह अनेक सिनेकलावंतांना पडला आहे. दिग्दर्शक – निर्माते महेश मांजरेकर व अभिनेते आदेश बांदेकर यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !