दीपनगर रेस्ट हाऊससमोर अनोळखी महिलेचे प्रेत आढळले


भुसावळ- दीपनगर रेस्ट हाऊस समोरून वाहणार्‍या नदी पात्रात 45 वर्षीय अनोळखी महिलेचे प्रेत वाहून आले आहे. मयत महिलेच्या अंगात भगव्या रंगाचे ब्लाऊज, गुलाबी रंगाची साडी असून डाव्या हातात काचेच्या हिरव्या रंगाच्या बंगड्या आहेत. पाण्यात राहून मृतदेह पूर्णपणे सडला आहे. अनोळखी महिलेबाबत कुणाला काही माहिती असल्यास वा ओळख पटत असल्यास भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार (9823122511) व पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड (9527818484) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.