मणिपूरच्या घटनेवर राजकारण लज्जास्पद : अमित शहा


नवी दिल्ली : मणिपूरमध्ये घडलेली घटना लज्जास्पद असून त्यावर राजकारण करणे त्याहूनही लज्जास्पद असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले. मणिपूरच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी जोरदार टीका करत संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शहा यांनी भूमिका मांडली.

जनतेने आम्हाला निवडून दिले आहे
शहा म्हणाले की, देशात गैरसमज पसरवला गेला आहे की या सरकारला मणिपूरवर चर्चा करायची नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून चर्चा करण्यास तयार होतो. तुम्ही चर्चा करायलाही तयार नव्हते. गदारोळ करून तुम्ही आम्हाला गप्प कराल, असे तुम्हाला वाटते. आपण ते करू शकत नाही. या देशातील 130 कोटी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.





29 एप्रिल रोजी एक अफवा पसरली की निर्वासितांच्या जागेला गाव घोषित केले आहे, त्यामुळे तणाव सुरू झाला. उच्च न्यायालयाने मैतईंना एसटीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. मणिपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयाने आगीत आणखीच भर पडली. देशाच्या पंतप्रधानांनी मला फोन केला आणि सकाळी सहा वाजता उठवले. हे लोक (विरोधक) म्हणतात की पंतप्रधानांना त्याची पर्वा नाही, असे अमित शाह म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !