अजित पवारांसोबतची भेट गुप्त नाहीच : 2024 मध्ये निकालावरून सत्य परीस्थिती समोर येणार : शरद पवार
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील तरुणांनी कुठल्या रस्त्यावरून जायचे हे 2024 मध्ये स्पष्ट होणार आह. आम्ही भाजपासोबत जाणार नाही, हे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. अजित पवारांशी झालेली भेट ही गुप्त भेट नव्हती. त्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीत माझ्याशिवाय काँग्रेस-ठाकरे गटाचा प्लॅन ही केवळ चर्चा आहे. प्रत्यक्ष अशी वस्तूस्थिती नाही. असत्यावर आधारीत ती चर्चा आहे. संजय राऊतांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
भाजपाकडून फूट पाडण्याचे काम
शरद पवार म्हणाले की, पवार कुटुंबात मी वडिलधारा असल्याने माझा सल्ला आजही घेतला जातो. ती गुप्त भेट नव्हती. मी भेटीनंतर काच खाली करून फुले स्वीकारून पुढे गेलो होतो. देशाची सत्ता भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या हातात आहे. त्यांची भूमिका समाजात एकता टिकवून ठेवण्याची आहे, पण ते लोकांमध्ये फूट पाडत आहेत. मोदी आणि भाजपाविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशभरात 2 सभा घेणार आहे. बिहार आणि कर्नाटकात मी सभा घेईन असं त्यांनी सांगितले.




देशात वेगळे चित्र
सत्तेचा गैरवापर आज होत आहे. केरळमध्ये भाजपा नाही, तामिळनाडूत नाही, कर्नाटकात नाही. आंध्र प्रदेशात भाजपा नाही. तेलंगणात नाही. महाराष्ट्रात भाजपा सरकार कसं सगळ्यांना माहिती आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडून आले. राजस्थानात, दिल्ली, पंजाब, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये भाजपा नाही. मी पुन्हा येईन असं कितीही म्हटलं तरी देशात वेगळे चित्र दिसेल यात शंका नाही असा टोलाही शरद पवारांनी भाजपाला लगावला.