पंतप्रधानांना मणिपूरमधील महिलांचे दुःख कळत नाही : आता सरकार उलथवण्याची योग्य वेळ ! ः शरद पवार बीडमध्ये कडाडले
Prime Minister does not understand the suffering of women in Manipur: Now is the right time to overthrow the government ! : Sharad Pawar got tough in Beed बीड : मणिपूरमध्ये स्त्रियांची धिंड काढली जात असतना देशाचे पंतप्रधान ढुंकून देखील पाहात नाहीत. त्यांना महिलांचे दुःख समजत नाही का, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे उपस्थित केला. ते म्हणाले की, बीडचे लोक निष्ठेच्या बाबतीत तडजोड करत नाही. त्याचा प्रत्यय आज पुन्हा आला, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी त्यांनी केली. शरद पवार यांनी बीडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या बंडानंतरची शरद पवार यांची बीडमधली ही पहिलीच सभा झाली.
आता सरकार उलथवण्याची योग्य वेळ
शरद पवार म्हणाले की, सरकार पाडण्याचे सत्र सुरू आहे. केंद्राची सत्ता वापरून सामान्य माणसांची सरकार पाडून टाकण्याचे काम करत आहेत. हे अतिशय वाईट आहे. ठाण्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये 18 लोक मृत्यूमुखी पडतात, त्याकडे हे सरकार बघ्याची भूमिका घेते. या चुकीच्या लोकांना आवरण्याची वेळ आली आहे. सत्तेचा गैरवापर करणार्यांना उलथून टाकण्याची सर्वांची भूमिका असली पाहिजे.




सरकारला लगावला टोला : सत्तेमागे निश्चित जात मात्र माणुसकी विसरू नका
शरद पवार म्हणाले की, राज्यात आता कितीतरी प्रश्न आहेत. महागाईचा प्रश्न आहे. पाऊस पाण्याचा प्रश्न आहे. खताच्या किंमती कुठे गेल्या आहेत त्यामुळे शेतकरी, कष्टकरी आणि काळ्या आईची सेवा करणारा व्यक्ती अडचणीत आहेत. त्यांची काळजी सरकारला नाही. सत्तेमागे जा पण माणुसकी विसरू नका, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस पुन्हा येईल असे म्हणाले, पण मुख्यमुंत्री म्हणून नाही. आता पंतप्रधान म्हणतायत मी पु्न्हा येईन, असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांना चिमटा काढला.