निष्ठा शरद पवारांसोबतच : नवाब मलिकांनी स्पष्ट केली भूमिका


Loyalty with Sharad Pawar : Nawab Malik clarified his role मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केल्याने राजकीय गोटातील चर्चा थांबल्या आहेत.

नवाब मलिकांनी स्पष्ट केली भूमिका
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत राहायचे यासंबंधीची त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ईडीने नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने नुकताच त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.





नवाब मलिक यांनी शरद पवारांसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहणार आहे, असे ते म्हणालेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !