तुमची पत असेल तर ठेकेदारांचे तीनशे कोटी आणून दाखवा : आमदार खडसेंचे प्रतिआव्हान !


If you have credit, bring 300 crores of contractors and show it : MLA Khadse’s counter-challenge! जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक आरोप केल्यानंतर आमदार खडसे यांनीदेखील प्रतिहल्ला चढवला आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी हे आरोप फेटाळून लावत सत्ताधार्‍यांना ठेकेदारांचे तीनशे कोटी रुपये आणून दाखवण्याचे आव्हान दिले आहे.

तुमच्यात दम असेल तर हे कराच
सत्ताधारी मंत्री आणि आमदार हे माझ्यावर एक हजार कोटींच्या कामांना ब्रेक लावण्याचा आरोप करत असले तरी त्यांनी आधी कंत्राटदारांचे तीनशे कोटी रूपये आणून दाखवावेत. सार्वजनीक बांधकाम खात्याच्या ठेकेदारांची 300 कोटींची बिले थकीत असून ही देयके मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. जर सत्ताधार्‍यांमध्ये दम असेल तर त्यांनी आधी हे 300 कोटी आणावेत मगच आपल्यावर आरोप करावेत, असे प्रतिआव्हान एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

गैरकामे खपवून घेणार नाही
पंतप्रधान मोदी हे ना खाऊंगा, ना खाने दुंगा असे म्हणत असतांना त्यांच्याच पक्षाचे लोक भ्रष्टाचाराला पाठीशी का घालत आहेत ? असा प्रश्न देखील एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला आहे. काहीही झाले तरी गैरकामे आपण होऊ देणार नाहीत. सरकार तुमचेच आहे. तुमची पत असेल तर आधी ठेकेदारांचे 300 कोटी रूपये द्या असे आव्हान त्यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री आणि आमदारांना दिले आहे. तर तिन्ही मंत्र्यांची शासन दरबारी काहीही किंमत नसल्याचा टोला देखील त्यांनी मारला आहे.

चाळीसगावच्या आमदारांचा गंभीर ओराप
आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांनी विधीमंडळ अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम खात्याबाबत लक्षवेधी उपस्थित केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार कोटी रूपयांची कामे रखडल्याचा आरोप केला. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी याला दुजोरा दिला. खडसे हे अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करत असून त्यांच्यामुळेच एक हजार कोटींचा निधी आणि त्यातून होणारी रस्त्यांची कामे थांबल्याचा आरोप देखील मंगेश चव्हाण यांनी केला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !