यावल शहरात रस्ता रोको आंदोलन करणार्‍या 62 आंदोलकांविरोधात गुन्हा


Case against 62 protestors who were protesting road block in Yaval city यावल : पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीकडून शहरातील अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर रस्ता सोमवारी रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे पावणेपाच तास हे आंदोलन चालल्याने वाहतुकीला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्यात आला तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघण केल्याने पोलिसांनी याप्रकरणी फिर्यादी होत आंदोलनात सहभागी विविध लोकप्रतिनिधींसह राजकीय पक्षांच्या तब्बल 62 कार्यकर्त्यांविरूध्द गुन्हा दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली.

असे आहे आंदोलन प्रकरण
यावल शहरातील अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर भुसावळ टी पॉईंटजवळ महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सावखेडासीम ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराबाबत पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या शेखर सोपान पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत रस्ता रोको आंदोलन केले होते.

जाणीवपूर्वक रस्ता अडवून अडथळा निर्माण केला तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघण केल्याने जिल्हा परीषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, यावलचे माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष पवन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गडाचे संतोष धोबी, पप्पू जोशी, राष्ट्रवादीचे कामराज घारू, निळे निशाण सामाजिक संघटनेचे विलास तायडे, शिवसेनेचे कडू पाटील, उस्मान तडवींसह 62 जणाविरुद्ध पोलीस शिपाई सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !