भारताने रचला ईतिहास : चंद्रयान- 3 चे यशस्वी लॅण्डींग

India made history: Successful landing of Chandrayaan-3 नवी दिल्ली : इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेतील चांद्रयान-3 ने आज मोठे यश मिळवले. चांद्रयान-3 मधील विक्रम हा लँडर आज नियोजित वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी सहा वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्टभागावर सुरक्षितरीत्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यवधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. भारताने रचलेल्या या ईतिहासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. 2019 साली भारताच्या चांद्रयान-2 या मोहिमेत अंतिम क्षणी अपयश आल्याने इस्त्रोसह देशवासियांची निराशा झाली होती. मात्र या अपयशाने खचून न जाता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अधिक जोमाने प्रयत्न करत चांद्रयान-3 मोहिमेची आखणी केली होती.
भारताने रचला ईतिहास
भारताने इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर चंद्राच्या या भागावर वाहन उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. चंद्राच्या कोणत्याही भागात वाहन उतरवणारा हा चौथा देश असून यापूर्वी केवळ अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीनने हे यश मिळवले होते. आता सर्वजण विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येण्याची वाट पाहत आहेत. धूळ स्थिरावल्यानंतर ते बाहेर येईल. विक्रम आणि प्रज्ञान एकमेकांचे फोटो काढून पृथ्वीवर पाठवतील.
रशियाचा विक्रम तुटला
हा विक्रम रशियाच्या नावावर झाला असता, भारतापूर्वी रशिया चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लुना-25 यान उतरवणार होता. हे लँडिंग 21 ऑगस्ट रोजी होणार होते, परंतु शेवटची कक्षा बदलताना ते मार्गापासून दूर गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले.
दरम्यान, 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 हे यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले होते. त्यानंतर एकएक टप्पा पार करत हे या चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत दाखल झाले होते. अखेर आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर अलगदपणे चंद्राच्या पृष्टभागाच्या दिशेने झेप घेत चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरला. त्याबरोबरच एक नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे.




