प्रेयसीसोबत लॉजमध्ये गेला ; शक्तीवर्धक गोळ्यांचे अतिसेवन केले अन घडले विपरीत असे काही….!


went to the lodge with the beloved ; Overdose of energy pills and something opposite happened….! भंडारा : तो अन ती दोघे प्रेमात आकंठ बुडालेले… दोघांनी सोबत लग्न करण्याचे ठरवले… दोघे एकमेकांसाठी भेटण्यासाठी भंडार्‍यातील एका लॉजमध्ये आले व रात्री मुक्कामाला राहिले. प्रेयसीला भेटण्याच्या अतिउत्साहात त्याने वियाग्रा (शक्तीवर्धक गोळ्या) अति सेवन केल्याने प्रियकराचा बीपी वाढला अन त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भंडारा बसस्थानकातील मध्यवर्ती लॉजमध्ये घडली. कृष्णा रायभान धनजोडे (27, केशोरी, ता.कामठी) असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबतचे वृत्त एका दैनिकाने आज प्रसिद्धीस दिले आहे.

असे आहे प्रकरण
कृष्णा धनजोडे हा तरुण गोंदिया जिल्ह्यातील आपल्या प्रेयसी असलेल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी भंडारा शहरात आला होता. दोघांनी दिवसभर पर्यटन केल्ययानंतर त्यांनी बसस्थानकातील एका लॉजमध्ये मुक्काम केला मात्र तरुणाने एका मेडिकलमधून शक्तीवर्धक दोनशे एमजीच्या चक्क दोन गोळ्या सेवन केल्यानंतर तरुणाला बीपीचा त्रास सुरू झाला. तरुणाचा रक्तदाब वाढल्यानंतर त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला व त्याचा मृत्यू झाला. घाबरलेल्या प्रेयसीने ही बाब लॉजमधील कर्मचार्‍यांना सांगितल्यानंतर कर्मचार्‍यांच्या मदतीने तरुणाीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले..


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !