जामनेर खुनाने हादरले : दुकानाची रखवाली करणार्‍या रखवालदाराची हत्या


Jamner murder shocked by the murder of the janitor guarding the shop जामनेर : जामनेर शहर खुनाने हादरले असून रखवालदाराची अज्ञातांनी मारहाण करीत हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अरुण आत्माराम सैतवाल (65, रा.शास्त्री नगर, जामनेर) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हे चोरीच्या उद्देशाने आले की अन्य उद्देशाने ही हत्या करण्यात आली? याबाबीचा कसून तपास यंत्रणा करीत आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास केली हत्या
अरुण सैतवाल हे जामनेर येथील शरद बारी यांच्या दुकानावर वॉचमनचे काम करत होते. 11 ऑगस्टच्या सकाळी 8 वाजेच्या पूर्वी (वेळ निश्चित माहित नाही)सुमारास ते झोपेत असतांना काही जण त्याठिकाणी आले आणि त्यांनी सैतवाल यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मारहाणीनंतर मारेकरी पळून गेले.

जखमी अवस्थेत सैतवाल यांना उपचारार्थ गोदावरी हॉस्पीटल जळगाव खुर्द येथे दाखल करण्यात आले होते व उपचार सुरू असताना 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान निधन झाले. याप्रकरणी जामनेर पोलिसात अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक दीपक मोहिते करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !