रेकी करीत जामनेर तालुक्यातील ढाब्यावर दरोडा : मुक्ताईनगर पोलिसांनी पाठलागाअंती टोळीला ठोकल्या बेड्या


Robbery at a dhaba in Jamner taluka by performing reiki: Muktainagar police shackled the gang after a chase मुक्ताईनगर : ढाब्यावर दोन दिवसांपूर्वी रेकी केल्यानंतर दरोडेखोरांच्या टोळीने जामनेर तालुकयातील नवी दाभाडी फाट्याजवळील एका ढाब्यावर बुधवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकला. दरोड्यातील रक्कम लुटून संशयित कारद्वारे पसार होत असताना ढाबे चालकांना जामनेर पोलिसांना सूचित करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली तर संशयित बोदवड-मुक्ताईनगरच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट होताच मुक्ताईनगर पोलिसांनी नाकाबंदी लावून संशयितांना पाठलाग करून अटक केली. संशयितांकडील गावठी पिस्टल, चॉपर आणि एक गुप्ती जप्त करण्यात आली.

रेकी करीत टाकला दरोडा
जामनेर-बोदवड रोडवरील वाडी फाट्याजवळ रवींद्र बडगुजर (रा. नवी दाबाडी) यांचा एकाकी ढाबा आहे. या ढाब्यावर काही लोक बसले असताना काही अंतरावर कार लावून चार संशयित पायी चालत ढाब्यावर आले. त्यांच्यापाठोपाठ आणखी चार जण येऊन त्यापैकी एकाने व्यवस्थापक रवींद्र वाघ यांच्या डोक्याला पिस्टल लावून गल्ल्याची चावी मागितली. चावी न दिल्याने त्यास लाकडी दांड्याने मारहाण केली तर दुसर्‍या एकाच्या मानेवर सुरा ठेवून इतरांकडून दीड लाखांचा ऐवज घेऊन दरोडेखोर बोदवडकडे पसार झाले.
याबाबत ढाबा मालक बडगुजर यांनी जामनेर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तात्काळ बोदवड-मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली.

दरोड्याच्या साहित्यासह संशयित जाळ्यात
मुक्ताईनगर हद्दीत पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जेरबंद केले. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. संशयित मुकेश फकिरा गणेश, शेख भुरा शेख बशीर, शेख शरीफ शेख, सलीम शाहरुख शहा चांद शहा, अझरुद्दीन शेख अमीनुद्दीन, अंकुश तुळशीराम चव्हाण, खजिनदार सिंग कुलबीर सिंग रीन, शेख नय्यूम शेख कयूम अशा आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 69 हजार 650 रुपयांच्या रोकडसह पिस्तूल, तीन जिवंत काडतूस, ईरटीगा, चॉपर आदी अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहु, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर, विनोद सोनवणे, हवालदार संदीप खंडारे, धर्मेंद्र ठाकुर, संदीप वानखेडे, राहुल बेहनवाल, संदीप धनगर, रवींद्र धनगर, मंगल सोळंके, अमोल जाधव आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !