पश्चिम बंगाल हादरले : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट ; पाच जणांचे मृतदेह हाती
West Bengal Shaken : Massive Explosion in Frecrackers Factory ; The bodies of five people were recovered नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाल्यानंतर पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले तर तीन मृतदेह हाती आले आहेत. स्फोटाची घटना नेमकी कशामुळे घडली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तर अनेकजण जखमी झाल्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी बारासात रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सकाळच्या सुमारास भीषण स्फोट
कोलकातापासून 30 किमी अंतरावर नीलगंजमधील मोशपोल येथे हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी कारखान्यात अनेक लोक काम करत होते. कोलकाता पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. याआधी मे महिन्यात पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथे बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात अशाच प्रकारे झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला.



