राज्यातील पहिलीच कारवाई जळगावातील गावठी दारू विक्री करणारी महिला स्थानबद्ध
जिल्हाधिकार्यांच्या आदेशानंतर जळगावातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ : आतापर्यंत 32 उपद्रवींवर एमपीडीएची कारवाई

The first action in the state is the arrest of a woman selling alcohol in a village in Jalgaon जळगाव : वारंवार गावठी दारू विक्रीचे गुन्हे करणार्या जळगावातील महिलेवर जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्धतेची कारवाई केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. एमपीडी अंतर्गत गावठी दारू भट्टी चालवणार्या महिलेवर कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना आहे. धनुबाई उर्फ धन्नो यशवंत नेतलेकर (50, हरीविठ्ठल नगर, जळगाव) असे स्थानबद्ध केलेल्या महिलेचे नाव असून तिला अकोला येथे हलवण्यात आले आहे.
वारंवार कारवाईनंतरही वर्तन ‘जैसे थे’
हरीविठ्ठल नगर परीसरात जानुबाई उर्फ धन्नू यशवंत नेतलेकर ही महिला बेकादेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू तयार करून हरीविठ्ठल नगर परिसरात विक्री करीत होती त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत होती. वारंवार तिच्यावर यापूर्वी कारवाया केल्यानंतरही तिच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने तसेच तब्बल 16 गुन्हे दाखल असलेल्या जानुबाई नेतलेकरच्या विरोधात एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पाठविला. प्रस्तावाची छाननी होवून तो जिल्हाधिकार्यांकडे पाठवल्यानंतर आदेश पारीत होताच महिलेला ताब्यात घेवून तिची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली. गावठी दारू विक्री करणार्या महिलेवर स्थानबद्धतेची ही कारवाईची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई रामानंदनगर पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुशील चौधरी, सुनील दामोदरे, राजेश चव्हाण, विजय खैरे, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील इरफान मलिक, महिला पोलीस राजश्री पवार आदींच्या पथकाने केली.