Nikhil Rajput Murder भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतची हत्या : काही तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Murder of notorious criminal Nikhil Rajput in Bhusawal : Accused in police net within few hours भुसावळ : बहिणीशी प्रेमविवाह झाल्यानंतरही तिच्या मनाविरोधात दुसर्या महिलेशी प्रेमसंबंध ठेवल्याने व या संबंधामुळे कुटूंबात वितुष्ट निर्माण झाल्याने कुविख्यात निखील राजपूतचा त्याचा शालक निलेश ठाकूरने तब्बल चाकूचे 21 वार करीत खून केला होता. ही घटना श्रीरामनगरातील पाण्याच्या जलकुंभावर शनिवारी मध्यरात्री दोन वाजता घडली होती. खुनानंतर निलेश ठाकूर पसार झाला होता मात्र बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासात संशयिताच्या मुसक्या बांधल्या.
आर्म अॅक्टसह शरीराविरुद्धचे तब्बल 19 गुन्हे
पोलीस सूत्रांच्या अधिकृत माहितीनुसार, निखील राजपूत विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात 17 तर शहर पोलिसात एक गुन्हा दाखल असून त्यात आर्म अॅक्ट, हद्दपारी आदेशाचे उल्लंघण, जबरी लूट, फौजदारावर हल्ला अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे तर दोन दिवसांपूर्वी फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत पिंपरूड फाट्यावरील महिंद्रा ढाब्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्याचा कर्मचारी प्रशांत सोनार यास फाईट मारल्याप्रकरणीदेखील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


संशयिताविरोधात गुन्हा दाखल
मेहुणा निखील राजपूत याच्या खूनप्रकरणी त्याचे वडिल सुरेश पांडू शिंदे (68 दत्तनगर, वांजोळा रोड, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यानंतर संशयित निलेश चंद्रकांत ठाकूर (22, कंडारी, ता.भुसावळ) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खुनातील आरोपी काही तासात बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन पाटील, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, हवालदार विजय नेरकर, हवालदार रमण सुरळकर, हवालदार निलेश चौधरी, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार यासीन पिंजारी, हवालदार महेश चौधरी, योगेश माळी, सचिन चौधरी, जावेद शहा, प्रशांत सोनार, योगेश महाजन, दिनेश कापडणे, अमर आढाळे यांच्या पथकाने निखील राजपूतच्या खुन प्रकरणी संशयित निलेश ठाकूर यास वांजोळा रोड भागातून शनिवारी दुपारी अटक केली.


