मराठा आंदोलकांवर लाठीमार : जालना पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर, अॅडीशनल डीजींकडून चौकशी : मुख्यमंत्र्यांची माहिती

Lathi charge on Maratha protesters: Jalna Superintendent of Police on forced leave, inquiry by Additional DG: Information from Chief Minister बुलढाणा : मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याचे राज्यात पडसाद उमटल्यानंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांन दिली तसेच अॅडीशनल डिजी (लॉ अॅण्ड ऑर्डर) सक्सेना यांच्या माध्यमातून आंतरवली सराटी येथील लाठीमार प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती
मुख्यमंत्री म्हणाले दुर्दैवी घटना
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील घटना दुर्देवी आहे. ती व्हायला नको होती. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्याशी तीन दिवसापूर्वी आपण बोललो होता. प्रकृती खालावत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचे आपण सांगितले होते. त्यांच्या मुद्यावरही राज्य शासन काम करत आहे. आपल्या जरंगे पाटील यांच्यासोबत तीन ते चार बैठका झाल्या होत्या. पण दुर्देवाने ही घटना घडली. या दुर्देवी घटनेस जबाबदार असलेेले तेथील पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून तसेच दुसरे अॅडीशनल एसपी व डीवायएसपींना जिल्ह्याबाहेर पाठविण्याचा निर्णयही घेण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर आहे.
शैलेश बलकवडे जालन्याचे नूतन पोलीस अधीक्षक
दरम्यान, जालना पोलीस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांनी आता पदभार स्वीकारला आहे. अत्यंत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून बलकवडे यांची ओळख आहे.
उद्या अॅडीशनल डीजी करणार चौकशी
अॅडीशनल डिजी (लॉ अॅण्ड ऑर्डर) सक्सेना हे या प्रकरणाची चौकशी करणार आहे. सोमवार, 4 सप्टेंबर रोजी ते जालन्यात पोहोचतील. या प्रकरणाच्या चौकशीमध्ये जे दोषी आढळतील त्यांना त्वराीत निलंबीत करण्यात येईल. वेळ पडली तर न्यायालयीन चौकशीही करण्यात येईल, याबाबत आपण आपणास आश्वस्त करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान या मुद्यावर काहीजण आपली राजकीय पोळी भाजू इच्छित आहे. त्यांना बळी पडून नका. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सामान्य माणसला अंतर दिले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.


