पंतप्रधानांनी नऊ वर्षात केवळ शिवसेना व राष्ट्रवादी फोडली : जळगावात खासदार शरद पवारांची कणखर टिका

भाजपावर पक्ष फोडण्याबाबत प्रथमच केली टिका : तपास यंत्रणा सरकारच्या हातच्या बाहुल्या झाल्याचा आरोप


Prime Minister only broke Shiv Sena and NCP in nine years: MP Sharad Pawar’s strong criticism in Jalgaon जळगाव : राष्ट्रवादी फुटीनंतर प्रथमच जिल्हा दौर्‍यावर आलेले खासदार शरद पवार जळगावच्या सभेत काय बोलणार ? याची राज्याला उत्सुकला लागली होती. जळगावातील सागर पार्कवर आयोजित हजारोंच्या जनसमुदायापुढे बोलताना खासदार शरद पवारांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी राष्ट्रवादीत भ्रष्ट माणसे असल्याचा अलीकडे केलेल्या आरोपावर बोलताना पवार म्हणाले की, तसे असेल तर त्यांनी त्यांच्यावर खटले भरायला पाहिजे मात्र हा प्रकार खोटा असल्यास तुम्ही काय कराल? हे विचारायलाही ते मागे हटले नाहीत. ते म्हणाले की, देशात नऊ वर्षात मोंदीन केवळ पक्ष फोडण्याचे काम केले. आधी शिवसेना फोडली व नंतर राष्ट्रवादी फोडली. राष्ट्रवादी फुटीवर प्रथमच त्यांनी थेट मोंदीवर निशाणा साधला.

शेतकरी आत्महत्येकडे सरकारचे दुर्लक्ष
शरद पवार म्हणाले की, देशात शेतकरी आत्महत्या करीत आहेत मात्र त्याच्याशी सरकारला देणे-घेणे नाही. पावसाअभावी शेतकरी अडचणीत आहे व अशावेळी दुष्काळी उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र त्यादेखील केल्या जात नाहीत. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर कारण नसतांना लाठीमार करण्यात आला. स्त्री-पुरुषासह लहान मुले जखमी झाल्याने महाराष्ट्र पेटल्याचे ते म्हणाले.चुकीच्या लोकांकडे राज्यासह देशाची सत्ता गेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 15 दिवसांत 20 लोकांनी आत्महत्या केल्या, अशी परिस्थिती आहे. देशात सध्या मोदीचं राज्य आहे, मोदींनी काय केलं, 9 वर्षे झाली. इतर राजकीय पक्ष फोडणे, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, हे फोडाफोडीचं राजकारण केलं, तेवढी एकच गोष्ट त्यांना येते.





सत्तेचा गैरवापर :यंत्रणा झाल्या बाहुल्या
शरद पवार म्हणाले की, केंद्र सरकारने वारेमाप सत्तेचा गैरवापर चालवला आहे. ईडी, सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून काही नेत्यांना तुरुगांत टाकण्यात आले व खोटे खटले दाखल केले. माजी मंत्री अनिल देशमुख व आमदार नबाब मलिक यांना तुरुंगात टाकण्यात आल्याचे ते म्हणाले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !