मुख्यमंत्र्यांचे आता फायनली ठरलं : पाचोर्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रम आता 12 रोजी होणार
दौर्याच्या तारखेत बदल : दहा मंत्र्यांची कार्यक्रमास राहणाा उपस्थिती

The Chief Minister’s final has now been decided: The government in Pachora will hold its Dari program on 12th पाचोरा : ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम 9 सप्टेंबर ऐवजी आता 12 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे. 9 तारखेला मुख्यमंत्र्याचा अचानक दिल्ली दौरा ठरल्याने हा नियोजित कार्यक्रम आता मंगळवार, 12 रोजी होणार आहे.
10 मंत्र्यांची राहणार उपस्थिती
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पाहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी होणारा 26 ऑगस्ट रोजीचा पाचोरा दौरा स्थगित झाला होता त्यानंतर हा दौरा 9 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले मात्र पुन्हा दौर्यात बदल झाला असून हा दौरा 12 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. पाचोरा-भडगाव तालूकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना.गिरीश महाजन, ना,. अनिल पाटील,ना.अब्दुल सत्तार, ना.दादा भुसे, डॉ.तानाजी सावंत यांच्यासह संपुर्ण मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाची शहरात जय्यत तयारी
शासनाच्या लोककल्याणकारी योजना व व्यक्तिगत लाभाच्या योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ’शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा निहाय सुरू आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरीय’ शासन आपल्या दारी’हा उपक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ’शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पाचोरा येथे होणार आहे.
विविध विकासकामांचे होणार भूमिपूजन
पाचोरा व भडगाव तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न सुरू असलेल्या नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल,ऑक्सिजन पार्क या सह विविध विकास कामांचे देखील भूमिपूजन व उद्घाटन केले जाणार आहेत. शिवाय पाचोरा व भडगाव तालुक्यातील सुमारे पंधरा हजार लाभार्थ्यांना विविध शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार किशोर अप्पा पाटील व प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी या पूर्वीच सर्व विभागाच्या अधिकार्यांच्या बैठका घेऊन नियोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे होणार उद्घाटन
नर्मदा ऍग्रोचे मुख्यमंत्री करणार उद्घाटन पाचोरा येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आटोपल्यावर नांद्रा, ता.पाचोरा येथील नर्मदा ऍग्रो या फॅक्टरीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रीगण,खासदार,आमदार व सर्व प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
12 रोजीकार्यक्रम : तयारीला वेग : आमदार किशोरअप्पा पाटील
मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा पाचोरा दौरा 9 सप्टेंबर रोजी निश्चित झाला होता. मात्र त्या दिवशी मुख्यमंत्र्याचा अचानक दिल्ली ठरल्याने हा कार्यक्रम आता 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सुमारे दहा ते बारा मंत्र्यांची उपस्थिती लाभणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारीला वेग दिला असल्याचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी ‘बे्रकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.