Bribe of 8000: Bribery Faujdar of Parola Police Station in the net of Jalgaon ACB आठ हजारांची लाच भोवली : पारोळा पोलीस ठाण्यातील लाचखोर फौजदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Bribe of 8000: Bribery Faujdar of Parola Police Station in the net of Jalgaon ACB पारोळा : गुन्ह्यात दोषारोपपत्र तातडीने दाखल करण्यासाठी तसेच गुन्ह्यात नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तडजोडीअंती आठ हजारांची लाच मागून पोलीस ठाण्यातच स्वीकारताना पारोळा पोलीस ठाण्यातील फौजदार जयंवत प्रल्हाद पाटील (54) यांना जळगाव एसीबीने मंगळवारी दुपारी साडेचार वाजता अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
अंचाळे, ता.धुळे येथील तक्रारदार यांच्यासह व त्यांच्या नातेवाईकांवर पारोळा पोलिसात गुन्हा रजि. नंबर 344/2023, भादंवि कलम 324, 323, 341, 342, 427, 504, 506, 34 प्रमाणे 12 ऑगस्ट 2023 राजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तसेच न्यायालयात दोषारोप पत्र तातडीने पाठवण्यासाठी सुरूवातीला लाचखोर फौजदाराने 30 हजारांची मागणी केल्यानंतर सुरूवातीला 20 हजार रुपये स्वीकारले मात्र त्यानंतर लाचेची हाव थांबली नाही व पुन्हा उर्वरीत 10 हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आठ हजार रुपये देण्याचे ठरले व तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली व बुधवारी दुपारी साडेचार वाजता पोलीस ठाण्यातच लाच स्वीकारताच जयवंत पाटील यास अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, बाळू मराठे, अमोल सुर्यवंशी, सचिन चाटे तसेच पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
