खान्देशातील प्रवाशांसाठी आजपासून भुसावळहून उधनासाठी स्वतंत्र मेमू : जाणून घ्या गाडीचे नेमके थांबे व वेळापत्रक
उधना-पाळधी मेमूला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी

Separate memu for Khandesh passengers from Aj to Bhusawal to Udhana: Know exact train stops and schedule भुसावळ : उधना-पाळधी मेमू आता भुसावळपर्यंत धावणार असून शुक्रवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दोंडाईचा स्टेशनवरून या गाडीला हिरवी झेंडी दाखवली. खान्देशातील प्रवाशांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांची मोठी सोय होणार आहे. आता थेट उधना येथून भुसावळपर्यंत प्रवाशांना कमी भाड्यात भुसावळपर्यंत येण्याची सोय झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या स्थानकांवर आहेत थांबे
19105 उधना-भुसावळ मेमू 15 सप्टेंबरपासून दुपारी 12.45 वाजता सुटेल व भुसावळ स्टेशन रात्री 9.50 वाजता पोहोचेल तर भुसावळ येथून रात्री 22.15 वाजता सुटल्यानंतर पहाटे साडेसहा वाजता उधना स्थानकावर पोहोचणार आहे.
या गाडीला पाळधी, चावलखेडे, धरणगाव, टाकरखेडे, अमळनेर, भोरटेक, पाडसे, बेटावद, नरडाणा, होल, सिंदखेडा, विखरण, दोंडाईचा, रनाला, टीसी, चौपाले, नंदुरबार, ढेकवड, खांडबारा, खाटगाव, चिंचपाडा, कोलडे, नवापूर, भाडभुंजा, लक्कड कोट, उकाई सोनगड, किकाकुई रोड, व्यारा, मढी, बारडोली, गंगाधरा, चलथान या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


