रेल्वे प्लॅटफार्मवर चढली ट्रेन ; अपघाताचे ‘धक्कादायक’ कारण आले समोर


मथुरा : मोबाईलचे दुष्पपरीणाम भलेही आपणास कितीही माहिती असलेतरी नागरीक मात्र वाहन चालवताना व अगदी वर्दळीच्या रस्त्यावरही चालताना मोबाईलपासून आपले लक्ष हटवत नाही व त्यामुळे अनेकदा अप्रिय घटना घडतात मात्र चक्क मथुरेमध्ये मोबाईलमुळेच रेल्वेचा अपघात झाल्याची बाब रेल्वेच्या तपासणीत उघड झाली आहे. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे काही दिवसांपूर्वी रेल्वे अपघाताला मोबाईल कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

असा झाला अपघाताचा खुलासा
मथुरा येथे रेल्वे स्थानकाव ट्रेन आल्यानंतर रेल्वे लोकोपायलट सचिन हा त्याच्या मोबाईलवर काहीतरी पाहत असताना ट्रेनच्या इंजिनमध्ये पोहोचला. त्याने आपली बॅग इंजिनच्यामध्ये डेस्कवर ठेवल्यानंतर मोबाईल सुरूच ठेवला व पहात राहिला व त्यातच बॅगेच्या दाबामुळे एक्सलेटर पुढे सरकले आणि ट्रेन पुढे जाऊ लागताच चक्क प्लॅटफार्मवरच चढली. ही चूक ‘क्रू व्हॉईस अँड व्हिडिओ रेकॉर्डिंग सिस्टिम’च्या माध्यमातून उघड झाली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !