छत्रपती शिवरायांची वाघनखे नोव्हेंबर महिन्यात भारतात येणार !
Chhatrapati Shivaji’s tiger will come to India in November! मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास मराठी माणसाला नव्हे तर जगाला प्रेरणादायी असून ही वाघनखे आणून आपण काय करणार आहात? असास प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित करीत सरकारवर टिका केली होती मात्र राज्यात एकीकडे टिकेचे राजकारण सुरू असताना आता ही नखे 16 नोव्हेंबर रोजी मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईसह नागपूर, सातारा, कोल्हापूर येथीलशिवप्रेमींना ही वाघनखे आपल्या जिल्ह्यात पाहता येणार आहेत.
तीन वर्षांसाठी वाघनखे संग्रहालयात ठेवणार : मुनगंटीवार
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारम्हणाले की, ‘महाराजांची वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्यात येत असून या वर्षाअखेरीस ही नखे महाराष्ट्रात येतील. मुंबई, पुणे,सातारा, कोल्हापूर, नागपूर, छत्रपतीसंभाजीनगर आदी शहरांतील संग्रहालयात ती ठेवण्यात येईल. ही वाघनखेते परत आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवारयांचे शिष्टमंडळ 1 ऑक्टोबरला लंडनलारवाना झाले. हे शिष्टमंडळ व्हिक्टोरिया, अल्बर्ट संग्रहालयला भेट देतील. वाघनखांबाबत उद्या 3 ऑक्टोबरला करार केला जात आहे.




शरद पवार स्पष्ट म्हणाले वाद नकोच
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी वाघ नघांबद्दल मोठे विधान केले. वाघ नखांबद्दल मला काही ज्ञान नाही. वाघ नखांबद्दल वाद निर्माण करावा, असे मला वाटत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडत या विषयावर अधिक बोलणे टाळले.