किनगावातील 37 वर्षीय तरुणाची राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

A 37-year-old youth in Kingaon committed suicide by hanging himself in his residence यावल : यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील 37 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अलताफ युनूस पटेल (37) असे मयत तरुणाचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
अलताफ या तरुणाने मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार त्याची आई शेतातून घरी परतली त्यावेळी निदर्शनास आला. तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व तरुणाचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणल्यानंतर डॉ.प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांना सोपवला. याप्रकरणी यावल पोलिसात पोलिस पाटील जुबेर शहा यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे. तपास हवालदार वासुदेव मराठे, गणेश ढाकणे करीत आहे.