स्वस्तातील कॉपर खरेदी बेतली जीवावर : जामदेतील टोळीने घेतला इंदूरच्या व्यापार्‍याचाा बळी

टोळक्यांचा बंदोबस्तासाठी कठोर पावले उचलण्याची अपेक्षा : आतापर्यंत शेकडोंना लावले चुना


Swastahl copper purchase failed : Gang from Jamde killed a businessman from Indore साक्री : साक्री तालुक्यातील जामदे गावातील काही टोळ्या सोने, चांदी, कॉपर, सुलेमानी पत्थर, मांडूळ आदी वस्तूंचे आमिष दाखवून बाहेरगावातील व्यापार्‍यांना गावात बोलावून त्यांना निर्जन जागी लुटून बेदम मारहाण करीत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत मात्र आता टोळक्याने इंदूरच्या व्यापार्‍याला दुचाकीवरून ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची तर सोबतचे दोघे जखमी झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. जामदेतील फसवणूक करणार्‍या टोळक्याची आता थेट व्यापार्‍याचा खून करण्यापर्यंत मजल गेल्याने त्यांना आता पोलिस यंत्रणेने त्यांना धडा शिकवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

असे आहे नेमके प्रकरण
मुंबईतील व्यावसायीक मगदुम खान यांना जामदे येथे स्वस्तात कॉपर मिळत असल्याची माहिती फेसबुकद्वारा केलेल्या जाहिरातीद्वारे मिळाल्यानंतर त्यांनी ही बाब मध्यप्रदेशातील इंदूरचे स्क्रॅप व्यावसायीक व मित्र अमित जैन यांना कळवली. दोघेही एकाच व्यवसायात असल्याने मगदुम खान हे मुलगा आवेस खानसह तर व्यापारी जैन हे जामदेत दाखल झाले. टोळक्याने सुरूवातीला तिघांना दुचाकीवरून बसवून काही अंतरापर्यंत नेत त्यांच्याकडील वस्तूंची लूट केली व व्यापारी अमित जैन यांना चालत्या दुचाकीवरून फेकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर खान पिता-पूत्र जखमी झाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !