जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने फेक अकाऊंटद्वारे पत्रकाराकडून 70 हजार उकळले : ‘शाहरूख’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या


70,000 extorted from a journalist through a fake account in the name of the collector: Shah Rukh was shackled by the police पुणे : फेक सोशल मिडीया अकाऊंटद्वारे चक्क पुण्यातील जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने पैशांची मागणी करून पत्रकाराकडून 70 हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शाहरुख खान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अनेकांना फेक प्रोफाईलद्वारे गंडा
राजस्थानमधल्या अलवर नगर जिल्ह्यातील बहादुरपूर गावातून शाहरूख खानला सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीने राज्यातील अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकार्‍यांचे बनावट प्रोफाईल फेसबुकवर बनवून लाखो रुपये उकळले आहेत.





फेक अकाउंटबाबत जिल्हाधिकार्‍यांनी केले होते आवाहन
काही दिवसांपूर्वी पुण्याचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचेही फेसबूकवर बनावट अकाऊंट तयार करण्यात आले होते. त्यांचे बनावट फेसबुक अकाऊंटवरुन मेसेज करुन फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. ‘कोणीतरी माझे फेक फेसबुक अकाऊंट उघडून माझ्या लिस्टमधील अनेकांना रीक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मेसेंजरवर संवाद साधत आहे. फर्निचर विकण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे. माझे अन्य कोणतेही फेसबुक खाते नाही. कोणीही संतोषकुमार नावाचा सीआरपीएफ अधिकारी माझ्या परीरचयाचा देखील नाही. या फेक अकाऊंटबाबत मी फेसबुकवर रिपोर्ट केला आहे. तसेच सायबर क्राईमच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. माझ्या मित्रांना विनंती आहे की त्यांनी या प्रकाराला फसू नये आणि कोणताही आर्थिक व्यवहार करु नये, असं आवाहन त्यांनी केलं होतं.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !