रेल्वे प्रवाशांनो ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ; रेल्वेचा पुन्हा ब्लॉक : 11 गाड्या रद्द तर आठ गाड्यांच्या मार्गात बदल


Railway passengers this news is important for you; Railway block again: 11 trains canceled and eight trains rerouted भुसावळ  : रेल्वे प्रशासनाकडून विविध तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात येत असून रद्द होणार्‍या गाड्यांमुळे त्यामुळे ऐनवेळी प्रवाशांना प्रवास रद्द करावा लागत आहे. भोपाळ विभागातील बुधनी-बरखेरा स्थानकादरम्यान तिसरी लाईन व नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी भुसावळ विभागातून भोपाळकडे जाणार्‍या 11 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत शिवाय आठ गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे.

या 11 रेल्वे गाड्या रद्द
रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-राणी कमलापती एक्सप्रेस ही गाडी 26 ऑक्टोबरला रद्द करण्यात आली तर राणी कमलापती-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी 27 ऑक्टोंबर रोजी रद्द करण्यात आली तर हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस ही गाडी 16 ते 25 ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. जयपूर-हैदराबाद एक्सप्रेस ही गाडी 18 ते 27 या काळात रद्द असेल तर लोकमान्य टिळक टर्मिनस-हरीद्वार एक्सप्रेस ही गाडी 16 ते 26 या काळात रद्द असेल. हरीद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी 17 ते 27 ऑक्टोंबरपर्यंत रद्द असेल तर भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी 15 ते 24 ऑक्टोंबरपर्यंत व हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी ि13 ते 22 ऑक्टोंबरदरम्यान रद्द करण्यात आली तसेच अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस ही गाडी15 ते 27 ऑक्टोंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. बरौनी-अहमदाबाद एक्सप्रेस ही गाडी 15 ते 27 ऑक्टोंबर या काळात रद्द करण्यात आली आहे तसेच अहमदाबाद-आसनसोल एक्स्प्रेस ही गाडी 26 ऑक्टोंबरला रद्द करण्यात आली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !