भारताची विजयाची हॅटट्रीक : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान चारीमुंड्या चीत
India’s hat-trick of victories : Pakistan beat Pakistan in ODI World Cup अहमदाबाद : संपूर्ण क्रिकेटविश्वाची नजर आजच्या भारत पाकिस्तान सामन्यावर लागलेली असतानाच अपेक्षेप्रमाणे भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवली. अहमदाबाद शहरातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान भारतीय संघाने गोलंदाजीत चमकदार कामगिरी केल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी संघाला धुवून काढले. दोन बाद 191 धावांचे आव्हान भारताने लिलया पार केले व वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका 8-0 अशी कायम राखली. या विजयासोबत भारतीय संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचला आहे.
विजयाची मालिका कायम
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने 30.3 षटकांत 3 गडी गमावत 192 धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे.




शुबमन गिलची धमाकेदार सुरूवात
वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पणाचा सामना खेळणार्या शुबमन गिलने धमाकेदार सुरुवात केली. हसन अलीच्या षटकात त्याने 3 चौकार खेचून पाकिस्तानी गोलंदाजांना दडपणात आणले. शाहीन आफ्रिदीच्या तिसर्या षटकात गिलने ( 16) पॉईंटच्या दिशेने जोरदार फटका मारला, परंतु शादाब खानने सुरेख झेल टिपला. रोहित शर्मा व विराट कोहली यांनी पाकिस्तानला चोप दिला. रोहितने आज षटकारांचा पाऊस पाडून वन डे क्रिकेटमध्ये 300 षटकार खेचणारा जगातील तिसरा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला. रोहित व विराट यांची 56 धावांची भागीदारी हसन अलीने तोडली. विराट 16 धावांवर झेलबाद झाला. पण, रोहित पाकिस्तानी गोलंदाजांना पुरून उरत होता आणि त्याने 36 चेंडूंत अर्धशतक झळकावले.
2003 च्या वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानने आज पहिल्या दहा षटकांत 79 धावा दिल्या आणि ही त्यांची दुसरी खराब कामगिरी ठरली. 2003मध्ये भारताविरुद्ध सेंच्युरियन येथे त्यांनी 88 धावा दिल्या होत्या. विराटच्या विकेटनंतर आलेल्या श्रेयस अय्यरनेही रोहितसह अर्धशतकी भागीदारी केली. शाहीनने भारताच्या कर्णधाराला माघारी पाठवले. रोहितने 63 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या, त्याचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आठवे शतक हुकले. भारताचा खेळ त्यानंतर थोडा मंदावला, परंतु लोकेश राहुल व श्रेयस यांनी संयमी खेळ करून विजय पक्का केला. भारताने 30.3 षटकांत 3 बाद 190 धावा केल्या. श्रेयस 53 धावांवर नाबाद राहिला, तर लोकेशनेही 19 धावा केल्या.