विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्पष्टच म्हणाले ; दोन महिन्यात निर्णय देण्याचे आदेशात नमूद नाही


मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र करण्यावरून सुरू असलेल्या सुनावणीनंतर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या मात्र नार्वेकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाची प्रत आपल्याला मिळाली असून या प्रकरणी योग्य तो कायदेशीर सल्ला घेतला जाईल, असे ते म्हणाले असून अपात्रतेबद्दल दोन महिन्यात निर्यण घ्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात कुठेही म्हटलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

नियमानुसार कारवाई होणारच
सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहेत त्या आदेशासंदर्भातील प्रत माझ्याकडे
प्राप्त झाले आहे. त्या आदेशाच्या प्रत मध्ये जे लिहिलेले आहे त्याचे अवलोकन केल्यानंतर जी कारवाई अपेक्षित आहे ती कारवाई नियमानुसार केली जाईल.





अपेक्षित कारवाई करणार
न्यायालयाने फटकारल्याच्या मुद्दयावर राहुल नार्वेकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची ती प्रत ऑनलाईन उपलब्ध आहे. सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहेत. त्या आदेशासंदर्भातील प्रत माझ्याकडे प्राप्त झाले आहे. त्या आदेशाच्या प्रतमध्ये जे लिहिले आहे व त्याचे अवलोकन केल्यानंतर जी कारवाई अपेक्षित आहे, ती कारवाई केली जाईल. न्यायालयाने दोन महिन्यात यावर निर्णय द्यावा असे त्यामध्ये म्हटलेले नाही. तसेच या प्रकरणावरून होणार्‍या टीकेमुळे आपण प्रभावित होणार नाही. विधीमंडळाचं सार्वभौमत्व राखून या प्रकरणी योग्य ती कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !