समृद्धीवर अपघाताची मालिका कायम : ट्रक-टेम्पो ट्रॅव्हलर अपघातात 12 ठार


Accident series continues on Samriddhi : 12 killed in truck-tempo traveler accident वैजापूर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून भीषण अपघातात तब्बल 12 जण ठार झाले आहेत तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री उशिरा वैजापूरनजीक ट्रक-टेम्पो ट्रॅव्हलर अपघात घडला. या अपघातात 18 नागरीक जखमी झाले आहेत.

पहाटे दीड वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक होवून ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणार्‍या सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला. सर्व मृत हे नाशिक शहरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.





टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते, असे सांगण्यात आले. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या घटनेत ट्रॅव्हलरमध्ये बसलेले 18 जण गंभीर जखमी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !