जळगावातील आर.एल.समुहावर ईडीची मोठी कारवाई : 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या जळगावातील आर.एल.समुहावर ईडीने मोठी कारवाई केल्याची माहिती ईडीने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिली आहे. आर.एल.समुहाच्या 315 कोटी रुपयांचे मूल्य असलेल्या 70 मालमत्ता जप्त करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ट्विटरद्वारे दिली कारवाईची माहिती
जैन कुटुंबाने एसबीआयकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात अलीकडेच आर.एल. समूहावर ईडीने छापा टाकला होता. यात सखोल चौकशी करण्यात आली असून यानंतर माजी आमदार मनीष जैन आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीतर्फे चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर ईडीने आज मोठी कारवाई केली असून या संदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.




ED has provisionally attached 70 immovable assets located in Jalgaon, Mumbai, Thane, Sillod and Kutch among other areas and movable assets, all valued at Rs.315.60 Crore in bank fraud case of M/s Rajmal Lakhichand Jewelers Pvt. Ltd., M/s R L Gold Pvt. Ltd., and M/s Manraj… pic.twitter.com/XrLHcC4LR2
— ED (@dir_ed) October 15, 2023
या माहितीनुसार, सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, मानराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड व आर.एल. गोल्ड प्रा. लि. या कंपन्यांच्या 70 मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. यात या कंपन्यांच्या मालकीच्या जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छ येथील मालमत्तांचा समावेश आहे. ही कारवाई पीएमएलए कायद्याच्या अंतर्गत करण्यात आल्याची माहिती ईडीने आपल्या ट्विटमधून दिली आहे.