शासकीय नोकरीतील कंत्राटी भरती रद्द : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Cancellation of contract recruitment in government job : Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced मुंबई : सरकारने कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस म्हणाले की, कंत्राटी भरती संदर्भात आमच्या सरकारवर आरोप केले जात आहेत मात्र हे पाप काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील आहे. हे खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे
आघाडी काळातच कंत्राटी भरती
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आघाडी शासन काळात पहिल्यांदा कंत्राटी भरती करण्यात आली. 2010 मध्ये शिक्षक भरतीचा कंत्राटी जीआर त्यावेळी काढण्यात आला. 14 जानेवारी 2013 रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना बीटेक, एमसीए, डेटा ऑपरेटर कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. 31 मे 2011 मध्येही कंत्राटी भरतीचा जीआर निघाला, 16 सप्टेंबर 2013 ला सामाजिक न्याय विभागात कंत्राटी भरतीचा जीआर काढला. त्यामुळे कंत्राटी भरतीतील दोषी कोण हे सगळ्यांना समजले पाहिजे असं फडणवीस म्हणाले.




लाज वाटत नाही का ?
शासकीय नोकरीत कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस-उबाठा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहे. कंत्राटी पद्धतीची सुरुवात काँग्रेस शासनाच्या काळात झाली. आज जे आंदोलन करतायेत, यांना लाजा का वाटत नाही? आपण करायचे आणि त्यानंतर आपणच आंदोलन करायचे आणि सरकारवर नाव ढकलायचे. कंत्राटी भरतीचे पाप हे 100 टक्के त्यांचे आहे असा आरोप फडणवीसांनी केला.