मोबाईल लुटताना रीक्षातून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू : नऊ तासात आरोपीचा एन्काउंटर


नवी दिल्ली : रीक्षातून जाणार्‍या विद्यार्थिनीच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावताना विद्यार्थिनी रीक्षातून पडून गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवल्यानंतर अवघ्या नऊ तासात आरोपीचे एन्काउंटर करण्यात आले. ही घटना गाझियाबादच्या मसुरी भागात घडली. किर्ती सिंग असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. गाझियाबादमध्ये ही विद्यार्थिनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती तर गुन्हेगार जितेंद्र ऊर्फ जीतू याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे तर त्याचा दुसरा साथीदार मात्र गोळीबारात जखमी झाला आहे.

मोबाईल लुटताना विद्यार्थिनी जखमी
विद्यार्थिनी किर्ती ही 27 ऑक्टोबर रोजी एका रीक्षातून जात असताना आरोपींनी दुचाकीवरून पाठलाग करीत तिला रीक्षातून बाहेर ओढल्यानंतर ती जमिनीवर पडून गंभीर जखमी झाली मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान, डीसीपी विवेक चंद्र यादव यांच्या माहितीनुसार, मसुरी पोलिस स्टेशन परिसरात कॅनॉल ट्रॅकवर तपासणी करीत असलेल्या पथकाला संशयित समोरून येताना दिसल्यानंतर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला असता त्यांनी गोळीबार केला व प्रत्त्युत्तरात झालेल्या गोळीबारात जितेंद्र ऊर्फ जीतू ठार झाला. त्याच्यावर दरोड्याचे 9 गुन्हे दाखल आहेत तर जितेंद्रच्या साथीदार आरोपी बोबील ऊर्फ बलवीर हा गंभीर जखमी असून त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.





जखमी विद्यार्थिनीचा मृत्यू
हापूड शहरातील पन्नापुरीतील रवींद्र सिंग हे लोको पायलट असून त्यांची मुलगी किर्ती सिंग गाझियाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात बीटेकच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ती मैत्रीण दीक्षासोबत ऑटोने कॉलेजहून हापूडला येत असताना वाटेत डासना उड्डाणपुलाजवळ दुचाकीस्वार दोन चोरट्यांनी मोबाईल हिसकावला मात्र या घटनेेत विद्यार्थिनी पडून जखमी झाली. विद्यार्थिनीवर गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात उपचार सुरू होते. ती व्हेंटिलेटरवर होती. रविवारी सायंकाळी 7.40 वाजता विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !